72 हुरे वादाच्या भोवऱ्यात ; ट्रेलर थेट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

0

मुंबई ;- संजय पूरण सिंह चौहान दिग्दर्शित 72 हुरेन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दहशतवाद आणि धर्माच्या नावाखाली लोकांना फसवण्याच्या कथेभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर या चित्रपटावर वाद सुरू झाला होता.

72 हूरें’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. काही लोकांना त्याच्यावर आक्षेप घेतला आहे तर काही लोकांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. या सगळ्यात चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं हिरवा कंदिल दिला असला तरी ट्रेलर प्रदर्शनासाठी नकार दिला. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर थेट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

72 हूरेंच्या ट्रेलरमध्ये धर्माच्या नावाखाली लोकांचे ब्रेनवॉश करून दहशतवादी संघटनेचा भाग कसा बनवला जातो हे दाखवण्यात आले आहे. जिवाची पर्वा न करता आत्मघातकी हल्ले करून इतरांना मारले तर त्यांना जन्नत आणि मृत्यूनंतर ७२ हूर मिळतील, असे या चित्रपटात दहशतवाद्यांना सांगण्यात आले आहे, पण नंतर सत्य समोर येते की या सर्व गोष्टी पूर्णपणे खोट्या आहेत.

72 हुरेंच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने सांगितले की, “72 हुरेन हा चित्रपट दहशतवादाला कसा प्रोत्साहन दिला जातो हे दाखवण्यात आले आहे. 72 हुरेंचे आमिष दाखवून त्यांना दहशतवादी बनवले जात आहे. हा चित्रपट दहशतवादाला विरोध करणाऱ्यांनी पाहावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.