प्रतापराव पाटील यांच्या या सर्वसाधारण वागणुकीचे सर्वत्र कौतुक…!

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाळधी (Paladhi) ता,धरणगाव येथे कुंभार समाजाच्या तरुणांचं लग्न सोहळा पाळधी येथील विठ्ठल मंदिरा शेजारी असलेले ‘पद्मसिद्धी लॉन अँड मंगल कार्यालय’ येथे पार पडला. नवरदेव मंडपात आला आणि मंगलाष्टक सुरू होताच त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे आगमन झाले. त्या ठिकाणी मंत्री पुत्र असल्याचा तथा स्वतः जिल्हा परिषद सदस्य असल्याचा कुठलाही गर्व न बाळगता ते थेट जाऊन आपल्या सर्वसामान्य मित्रमंडळी मध्ये जाऊन बसले,

मतदारसंघातील असो किंवा मतदार संघाबाहेरील, आमंत्रित केलेल्या ठिकाणी जि.प प्रतापराव पाटील हे आवर्जून आपली उपस्थिती दर्शवतात. मतदार संघातील सर्वांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होणारे युवानेते म्हणून त्यांची ओळख आहे.

प्रतापराव पाटील यांनी याठिकाणी आपली उपस्थिती नोदवली होती, मात्र याठिकाणी सर्वसामान्यांमध्ये बसताच उपस्थिताच्या भुवया उंचावल्या. वडील राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना व स्वतः जिल्हा परिषद सदस्य असल्याचा कुठलाही गर्व न बाळगता ही व्यक्ती सरळ जाऊन सर्वसामन्यांमध्ये जाऊन बसल्याने सर्वत्र प्रतापराव पाटील यांचे कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.