कुणालाही न सांगता ललितला आणले नाशिकमध्ये, नेमकं काय आहे प्रकरण ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ड्रग्स माफिया ललित पाटील याला चार दिवसांपूर्वी बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टात हजार करण्यात आलं. त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. उद्या ललित पाटील याची कोठडी संपत आहे. त्याच्यापूर्वी पोलीस त्याला आज अचानक नाशिकमध्ये घेऊन आले. यावेळी कुणालाच खबर देण्यात आली नाही. पोलीस अचानक ललित पाटीलला घेऊन आले आणि त्याची कसून चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे.

आज सकाळी सकाळीच मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला घेऊन नाशिक गाठलं. त्याला नाशिकच्या शिंदे पळसे गावात घेऊन आले. यावेळी पोलीस साध्या ड्रेसमध्ये होते. विशेष म्हणजे पोलीस व्हॅनमधून पोलीस आले नव्हते. तसेच येणार असल्याचं पोलिसांनी नाशिक पोलिसांनाही सांगितलं नाही. थेट गुप्तपणे शिंदे पळसे गाव गाठलं.

ज्या शिंदे पळसे गावात ललित पाटील एमडी ड्रग्स तयार करायचा तिथल्या कारखान्यावर त्याला आणण्यात आलं आहे. त्याला बुरखा घालण्यात आला होता. त्याला थेट कारखान्यात नेण्यात आलं. यावेळी त्याने पोलिसांना कारखान्याची माहित दिल्याचं सांगितलं जात. ड्रग्स कसे बनवायचे? किती लोक असायचे?
त्याच वितरण कसे व्हायचे? आदी माहिती मिळवण्यासाठी पोलीस त्याला घेऊन आले होते. त्याने ही माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे.

नाशिककडे रवाना
तब्बल १५ ते २० पोलीस या कारखान्यात होते. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन नाशिकला रवाना झाले. नाशिकच्या उपनगरात ललितच घर आहे. त्याच्या घरी त्याला पोलीस घेऊन जाणार असल्याचीही चर्चा होती. पण पोलीस थेट मुंबई-आग्रा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

कोठडी वाढवून मागणार?
ललित पाटील याची उद्या कोठडी संपत आहे. त्यामुळे त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावेळी पोलिसांकडून त्याच्या कोठडीत वाढ होण्यासाठी
मागणी केली जात आहे. कारण ललितच्या ड्रग्सच्या व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.