धर्मशाला येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, आजचा सामना रद्द होण्याची शक्यता !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज भारतीय संघ वनडे वर्ल्ड कप २०२३ मधील पाचवा सामना खेळणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना न्यूझीलंडविरद्ध खेळाला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरु होईल. दोनही संघानी या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. पण चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. वास्तविक, धर्मशाला येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंवा मग हा सामना कमी शतकांचा असू शकतो.

Accuweather नुसार, रविवारी धरमशाला येथील कमल तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. या दिवशी पब्सची शक्यता ४३ टक्के आहे. आकाश ढगाळ असेल आणि वाऱ्याचा वेग २६ किमी/ताशी असेल.

चाहत्यांची याठिकाणी निराशा होऊ शकते. सामना दुपारी २ वाजता सुरू होणार असून, यादरम्यान पावसाची शक्यता जास्त वर्तवण्यात आली आहे. धर्मशाला मध्ये दुपारी २ वाजता पावसाची शक्यता ५१ टक्के आणि दुपारी ३ वाजता ४७ टक्के आहे.

मात्र, चांगली गोष्ट म्हणजे ३ वाजेनंतर पावसाची शक्यता खूपच कमी होईल. ४ ते ६ या वेळेत पावसाची शक्यता १४ टक्के असेल. सामना उशिरा सुरु होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.