‘बाजीगर’ फेम ‘या’ अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘बाजीगर’ फेम आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता दलीप ताहिल यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. दलीप ताहिल यांना २ महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ६५ वर्षांच्या भिनेत्याला ५ वर्षे जुन्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारूच्या नशेत कार चालवणं दिलीप यांना चांगलेच महागात पडले आहे.

दारूच्या नशेत असतांना दिलीप यांनी रिक्षाला धडक दिली होती. ही घटना २०१८ मध्ये घडली होती. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली होती. तब्बल ५ वर्षानंतर याप्रकरणी कोर्टाने अभिनेत्याला २ महिन्याचा तुरुंगवास झाला आहे.

संपूर्ण प्रकरण हे २०१८ मधील आहे. या अभिनेत्याला अपघात झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली होती. अभिनेत्यावर दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा आणि कारने रिक्षाला धडक दिल्याचा आरोप होता. रिक्षात असलेल्या महिला प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाली होती. या अपघातानंतर दलीप ताहिलने रिक्षाला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. हे प्रकरण कोर्टात सुरूच होते, पण अभिनेत्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आता प्रकरणात दलीप ताहिल यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.