पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती, दारूच्या नशेत १० ते १५ गाडयांना उडवले

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे शहरात पुन्हा संतोष माने प्रकरणाची रविवारी पुनरावृत्ती झाली. हिट अँड रान सारखा प्रकार समोर आला. हा प्रकार चक्क पीएमटीच्या चालकाने केले आहे. पीएमटीच्या बस चालकाने दारू पिऊन बस त्यावेळी रस्त्यात आलेल्या दहा ते पंधरा गाडयांना त्याने उडवले. तो गाडी चालवत असताना बसमध्ये तब्बल ५० प्रवाशी होते. ते सर्व जीवामुठीत धरून बसले होते. दरम्यान, मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने हा प्रकार का केला? हा प्रकार त्याने का केला हा प्रकार असून समोर नाहीये. हा सगळा प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली होती.

दारुच्या नशेत उलटी बस चालवली
पुणे येथील पीएमटी बसचालक निलेश सावंत याने संतोष मानेसारखा प्रकार केला आहे. त्याने दारूच्या नशेत बस चालवत तब्बल १० ते १५ गाडयांना उडवले आहे. सेनापती बापट रोड, वेताळबाबा चौकात हा भयानक अपघात घडला आहे. तो बस चालवत असताना त्यात ५० प्रवाशी प्रवास करत होते. दारूच्या नशेत निलेश सावंत याने उलटी पीएमटी बस चालवत अनेक वाहनांना धडक दिली आहे.

या तरुणामुळे वाचले अनेकांचे प्राण
पुणे येथील पीएमटी बसचालक निलेश सावंत दारुचा नशेत बस चालवत होता. यावेळी कृष्णा जाधव यांनी जीवाची परवा न करता लोकांचे प्राण वाचवले आहे. बसचालका विरोधात चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.