त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरूस दरम्यान इतर धर्मियांकडून मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं. पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र पोलिसांना देण्यात आलं.या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणी वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत.

तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघाची मागणी केली. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे. यावर मुख्य मुख्यमंत्र्यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले “कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे पण लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे” राज्यात सर्व जातीपातीची लोकं राहतात. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. कुठलेही तणाव पूर्ण वातावरण राहणार नाही. कायदा व सुरक्षेची जबाबदारी सरकारची राहील असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. असे सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.