गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड, ५८०लिटर अवैध गावठी दारू नष्ट

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

तालुक्यांतील भोरटेक शिवारात अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर आज सकाळीं भडगाव पोलिस स्टेशनचे पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रसेन पालकर पो. हे काँ. नरेन्द्र विसपुते, निलेश ब्राम्हणकर, एकनाथ पाटील यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली असता गावठी दारूचे हातभट्टी ५८० लिटर कच्चे, पक्के रसायन व चार लिटर गावठी दारू असे एकूण २३,४०० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू नाश केली आहे. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला पो.हे.कॉ.नरेंद्र विसपुते यांच्या फिर्यादवरून आरोपी-अनिल वसंत गायकवाड रा. भास्कर नगर कजगाव ता.भडगाव याच्याविरुद्ध भा.द.वी.कलम कलम 65 (फ),(ब),(क) इ. दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहॆ. पुढील तपास जिजाबराव पवार हे करत आहे. तालुक्यात अवैध गावठी दारू तयार करण्याचे प्रमाण जास्त असुन यावर अश्या प्रकारची करवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी भडगाव पोलिसांनि सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.