पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून केला खून

0

एरंडोल शहरातील घटना ; पतीला अटक
एरंडोल;-  घरगुती भांडणाच्या कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून खून केल्याची घटना येथील गांधीपुरा भागात आज सोमवारी १९ जून रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून संशयित आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे.

हर्षदा किरण मराठे (वय-२७, गांधीपूरा, एरंडोल) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे माहेर नंदुरबार येथील असून संशयित पती किरण महादू मराठे (वय-३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हर्षदा मराठे या महिला पती किरण महादू मराठे यांच्यासह शहरातील गांधी पुरा भागात वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून मराठे दाम्पत्यात कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजतादेखील वाद उफाळून आला. यात संतापाच्या भरात पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा मराठे यांच्या डोक्यात घरातील फरशी मारली. यात विवाहिता हर्षदा गंभीर जखमी झाल्या.

अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीष गोराडे व सहकाऱ्यांनी यांनी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. संशयित आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. महिलेच्या पश्चात २ मुले असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.