Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2024No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर :- देऊळगाव गुजरी येथे खळबळजनक दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या आपसातील वादातून पतीने आपल्या पत्नीसह ११ महिन्यांच्या मुलीची हत्या केली व त्यानंतर दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १२) उघडकीस आली असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    देऊळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी विवाह झाला होता. पतीला दारूची सवय असल्याने त्याने लग्न झाल्यापासून लहानमोठे वाद उकरून काढत प्रतिभाचा मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले. दोन लहान मुली व

    त्यातच पतीचे दारूचे व्यसन याचा त्रास असह्य झाल्याने गत चार महिन्यांपासून प्रतिभा पतीला सोडून ११ महिन्यांच्या मुलीसह माहेरी निघून आली होती. मध्यंतरी विशालने प्रतिभाची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला. परंतु, प्रतिभाने त्यास नकार दिला. शुक्रवारी देऊळगाव गुजरी येथे प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल पुन्हा प्रतिभाला नेण्यासाठी तसेच तिची समजूत घालण्यासाठी आला होता. प्रतिभाने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने विशालने धारदार शस्त्राने प्रतिभा आणि चिमुकल्या दिव्याची गळा कापून हत्या केली व तेथून फरार झाला. प्रतिभाच्या वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी घरी धाव घेतली, त्यावेळी त्यांना आपली मुलगी प्रतिभा व नात दिव्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच फत्तेपूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी देऊळगावकडे घाव घेतली. पत्नी व चिमुकल्या मुलीचा खून करून फरार झालेल्या विशालने दुधलगाव गाठले व कमरेला दगड बांधून गावातील एका विहिरीत उडी घेऊन त्याने स्वतःचेही जीवन संपविले.

    याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश फड व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #murder Jamner Sucide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!

    October 6, 2026

    पाचोरा शहरातील बॅग चोरी गुन्हा उघडकीस : आरोपी ताब्यात

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif