नागपुरात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरात हत्यांचे सत्र सुरूच आहे. नागपूरच्या पांचगाव येथील पदाधिकाऱ्यांची मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. राजू डोंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे.

राजू डोंगरे मृतदेह विहरगाव परिसरात आढळून आला आहे. मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

ढाब्यावरील कर्मचायांवर हत्येचा संशय
राजू डोंगरे हे ग्रामपंचायत निवडणुकीतले विजयी उमेदवार होते. त्यांच्या ढाब्यावरील कर्मचार्यांनीच हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. पुढील तपस पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी राजू डोंगरे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. यामुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.