लोकशाही न्यूज नेटवर्क
श्रीनगरमधील प्रसिद्ध ‘दल सरोवर’वर शनिवारी पहाटे लागलेय भीषण आगीत ५ हाऊसबोट जळून खाक झाल्या आहे. सरोवराच्या घाट क्र. ९ वर असलेल्या एका हाऊसबोटमध्ये आग लागली आहे. ही आग वेगाने पसरली त्यामुळे आजूबाजूच्या चा हाऊसबोटही जाळून खाक झाल्या आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक वृत्तानुसार, संबंधित आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. तत्पूर्वी या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग नियंत्रणात आणली.
#WATCH | Several houseboats were gutted in a fire in Srinagar's Dal Lake last night pic.twitter.com/uDtuOQO9yw
— ANI (@ANI) November 11, 2023
दल सरोवर मधील हाऊसबोटींना लागलेय आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर हाऊसबोटींच प्रचंड नुकसान झालं असून, ते कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.
पर्यटकांमध्येही या बोटींचं प्रचंड आकर्षण असते. या बोटींची बांधणीही खास पद्धतीने केली जाते. श्रीनगरमधील हे दल सरोवर बघण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. हे जम्मू -काश्मीरमधील पर्यटनाचे मुख्य केंद्रबिंदू मानले जाते.