मालवाहू टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील मैत्रीय हॉटेल समोरील चौकातील महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू टेम्पो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास धाडली. याप्रकरणी गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात रहिवासी असलेले मिर्झा वसीम बेग मेहमूद बेग (वय ४०) हे अँग्लो हायस्कुल येथे नोकरीला आहे. बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता ते दुचाकी (एमएच १९ सीबी ४१८६) ने घरी जात होते. शहरातील मैत्रेय हॉटेल समोरून दुचाकीने जात असतांना समोरून मालवाहू टेम्पो क्रमांक (एमएच १९ सीवाय ४०० ) ने जोरदार धडक दिली असता, या धडकेत मिर्झा वसील बेग जखमी होऊन पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.