लोकशाही न्यूज नेटवर्क
बीड जिल्हा उप्रादेशिक परिवहन कार्यालय ऐन दिवाळीच्या हंगामात जास्तीचा तिकीट दर वसूल करणाऱ्या ३ खाजगी बस जप्त करीत ४० बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान जास्तीचे तिकीट दर वसूल करणाऱ्या ट्रॅव्हल्सकडून भाड्याचे पैसे ग्राहकांना परत देण्यात आल्याने प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आभार मानले.
दिवाळी निमित्त राज्य परिवहन महामंडळ तसेच खाजगी बसला प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडून ज्यादा तिकीट दर आकारण्यात येत आहे. याबाबतची तक्रार बीड जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात देखील केली जात असे.
या तक्रारींच्या आधारे मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत धडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत तीन ट्रॅव्हल्स बस जप्त करण्यात आल्या. तसेच या ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी बस मधून प्रवाशांना सोडण्यात आले. यावेळी प्रवाशांनी प्रशासनाचे आभार मानले.