उमाळे फाट्याजवल दुचाकी स्लिप होऊन तरुण जागीच ठार, १ गंभीर जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील उमाळे फाट्याजवल दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला असून, त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, विशाल राजेंद्र सपकाळे (वय२१) रा. ता. जि. जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, विशाल राजेंद्र सपकाळे हा तरुण आई वडील व मोठा भाऊ सोबत जळगाव तालुक्यातील देव्हारी येथे वास्तव्याला आहे. तो एमआयडीसीतील सिद्धार्थ केमिकल कंपनीत वेल्टमध्ये कमला होता. शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी विशाल सपकाळे हा त्याचा मित्र विशाल गुळवे यांच्यासोबत दुचाकी (एमएच१९.५६१३) ने कंपनीतून देव्हारी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. जळगाव तालुक्यातील उमाळे फाटाजवळ असलेल्या वळणावर त्यांची दुचाकी स्लिप झाली. त्यात विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. च्यासोबत असलेला विशाल गुळवे हा गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मयत विशाल सपकाळेच्या पश्चात वडील राजेंद्र गोविंदा व आई मीराबाई मोठाभाऊ निखिल मोठाभाऊ निखिल आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.