लोकशाही न्यूज नेटवर्क
तेलुगू सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आह. दिग्गज अभिनेते चंद्रमोहन यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकारासंबंधित आजारामुळे चंद्रमोहन यांना रुग्नालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले आहे.
शनिवारी त्यांना सकाळी ९: ४५ च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. चंद्रमोहन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून टॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स आणि अनेक सेलिब्रेटी मित्र त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. चंद्रमोहन यांच्या पश्चात पत्नी जालंधरा आणि दोन मुली असा परिवार आहे. अभिनेत्यावर सोमवारी हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
चंद्रमोहन यांचा जन्म २३ मी १९४१ रोजी झाला होता. १९६६ मध्ये ‘रंगूला रत्नम’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी जवळपास आपल्या सिने कारकिर्दीत एकूण ९३५ चित्रपटांमध्ये काम केले.