लोकशाही न्यूज नेटवर्क
धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-धुळे एक्सप्रेस रोज धावणार असल्याची अधिसूचना रेल्वे विभागाने जरी केल्याची माहिती खासदार डॉ. सिभाष भामरे यांनी दिली आहे. दरम्यान, धुळे-मुंबई एक्सप्रेस दररोज धावण्याची अद्याप तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, ही एक्सप्रेस घुले ते दादर अशी असणार आहे.
धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे नव्हती. धुळे-चाळीसगाव रेल्वेला दोन मुंबई बोगी लावण्यात येत होत्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात ही सेवा बंद झाली होती. तेव्हापासून धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले होते.
त्यामुळे स्वतंत्र दोन बोगीऐवजी मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरु करावी शी मागणी डॉ. भामरे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने धुळे-दादर एक्सप्रेस प्रायोगिक तत्वावर २९ एप्रिल २०२३ पासून सुरु केली. ही गाडी सह्या तीन दिवस धावत आहे. ही गाडी मुंबईहून दुपारी 12 वाजता सुटून रात्री 8.50 वाजता धुळ्यात पोहचेल, तर धुळ्याहून सकाळी ६.३० वाजता सुटून दुपारी २.१५ वाजता मुंबईला पोहचणार असल्याचे पत्रात म्हटलेले आहे.