जगात या ठिकाणी आढळते सर्वाधिक सोने ; जाणून घ्या …

0

 

नवी दिल्ली ;- जगभरात सोन्याला मागणी आहे. भारतात सोन्याला मोठी मागणी आहे. साधारणपणे ज्या देशाच्या मध्यवर्ती बॅंकेकडे जितकं सोनं आहे, त्यानुसार त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे असे मानले जाते. त्यानुसार, भारताकडेही मुबलक प्रमाणात सोने आहे. तसेच लोकांना सोने धारण करण्याची आवडही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावं लागतं.. जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात सापडते हे जणू घेऊ …

येथे सापडतं सर्वात जास्त सोनं

जगात अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. त्या पैकी जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण कोठं आहे? याचा विचार केला तर दक्षिण आफ्रिकेत विटवॉटर्सरँड बसीन हे नाव सर्वात आधी येतं. आफ्रिकेत विटवॉटर्सरँड बसीन येथील खाणीत सर्वात अधिक सोनं सापडतं. आतापर्यंत जगभरात उत्खनन झालेल्या सोन्यापैकी 30 टक्के सोनं याच खाणीत सापडलं आहे.

जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींमध्ये दक्षिण आफ्रिकेतीलच सुपर पिट, ऑस्ट्रेलियातील न्यूमाँट, इंडोनेशियातील ग्रासबर्ग आणि अमेरिकेतील नेवाडा खाणीचा समावेश होतो. या ठिकाणी इतर खाणींच्या तुलनेत जास्त प्रमाणात सोनं सापडतं. सध्या सोन्याचे सर्वाधिक उत्खनन चीनमध्ये केले जाते. त्यानंतर कॅनडा, रशिया आणि पेरू या देशांत उत्खनन होते.

सोनं हे उत्खनन करुन मिळवलं जातं. ही प्रक्रीया वाटते तितकी सोपी नाही. नेवाडामधील बॅरिक गोल्डस् ही कंपनी सोन्याचे सर्वाधिक उत्खनन करणारी कंपनी आहे. ही कंपनी एका वर्षात सुमारे 35 लाख औंस इतक्या सोन्याचे उत्पादन करते. पृथ्वीवर सोन्याच्या नव्या खाणींचा शोध लागत आहे. अनेक नव्या खाणी सापडल्या आहे. ज्यात मोठ्या प्रमणात सोने आहे. असे असले तरी जुन्या खाणी या दुर्मिळ आहे. या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा आहे. त्यामुळे जुन्या खाणींमधूनच सोन्याचे बहुतांश उत्पादन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.