जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून मनपा दवाखान्याची पाहणी

0

जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी सकाळी मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयात जाऊन तपासणी केली.

नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली असून या घटनेच्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही पाहणी केली. यावेळी औषध साठाची माहिती घेतली असता पुरेपुर प्रमाणात औषधसाठा शिल्लक असल्याचे आढळून आले. यावेळी मनपाच्या उपायुक्त आयुक्त निर्मला गायकवाड, प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.