आज पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरती परीक्षा

0

जळगाव :-जिल्हा परिषदेतील क गटाच्या एकूण 664 रिक्त जागांसाठी सात ते 11 ऑक्टोबर दरम्यान आयबीपीएस कंपनीतर्फे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा होणार असून पहिल्या दिवशी रिंग मॅन ,वरिष्ठ सहाय्यक पदासाठी परीक्षा होणार आहे.

 

जिल्ह्यात 34 हजार 287 उमेदवार परीक्षा देणार असून कॉफी सारखे गैरप्रकार केल्यास तीन वर्ष डिबारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उमेदवारांनी आवश्यक प्रवेश पत्र जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यामध्ये आठ संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत.

 

जिल्ह्यातील भुसावळ येथील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय ,नशिराबाद येथील उज्वल इन्स्टिट्यूट , पाळधी येथील साई इन्स्टिट्यूट ,कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव या परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.