मस्करी सहन न झाल्याने चाकू हल्ला ;एकाचा खुन,दुसरा गंभीर जखमी

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चहाच्या टपरीवर सुरू असलेली चेष्टा मस्करी सहन न झाल्यामुळे चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना यावल येथे घडली. यात एक जण गंभीर जखमी तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे . यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

यावल शहरातील गजबजलेल्या बोरावल गेट परिसरात आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळ च्या सुमारास धनगरवाडा येथील राहणारे प्रभाकर आनंदा धनगर (वय ५५) हे चहाच्या स्टॉलवर बसलेले होते. या ठिकाणी उपस्थितांमध्ये चेष्टा मस्करी सुरू होते. यातूनच रामा केशव ढाके (रा. व्यास नगर यावल) या व्यक्तीने चेष्टा मस्करी चालु असतांना ती सहन न झाल्याने त्याच्या हातातील चाकुने प्रभाकर धनगर यांच्यावर ह्ल्ला करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे

याबाबत जखमी व्यक्तीचे भाऊ अशोक आनंदा धनगर यांनी फिर्याद दाखल केल्याने विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान व पोलीस करीत आहे.

दरम्यान याच प्रकरणात आशा रामा ढाके ( वय ५०, रा. देशमुख वाडा यावल ) यांनी दिलेल्या दुसर्‍या फिर्यादीत म्हटले आहे की बोरावल गेट यावल येथे दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास रामा केशव ढाके हे चहाच्या टपरी समोर सार्वजनिक ठिकाणी उभे असतांना संशयीत आरोपी प्रभाकर आनंदा धनगर यांने रामा ढाके यांना अश्लील शिविगाळ करीत लोखंडी सळईने फिर्यादीचे पती यांना डोक्यावर हातापायावर मारहाण करीत गंभीर जख्मी केले असल्याची फिर्यादीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.