बस उलटून भीषण अपघात, 18 ठार, 29 जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मेक्सिकोमध्ये  व्हेनेझुएला आणि हैतीमधून प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटल्याची घटना शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी घडली. या अपघातात दोन महिला आणि तीन लहान मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, ओक्साका आणि शेजारच्या प्यूब्ला राज्याला जोडणाऱ्या महामार्गावर पहाटे हा अपघात झाला. या बस अपघात मेक्सिकोच्या शेजारील राज्य प्यूब्लाच्या सीमेजवळ असलेल्या टेपेलामेम शहरात घडला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बस अपघातात एकूण 29 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय इमीग्रेशन एजन्सीनं सांगितलं की, बसमध्ये 55 परदेशी नागरिक होते. तसेच, अपघातग्रस्तांमध्ये 55 विदेशी नागरिकांचाही समावेश करण्यात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.