Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»महिलेच्या पर्समधून साडेचार लाखांचा मुद्देमाल लांबविला
    गुन्हे वार्ता

    महिलेच्या पर्समधून साडेचार लाखांचा मुद्देमाल लांबविला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 30, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कारमध्ये ठेवली रोकड व दागिन्याची पर्स असा एकुण ४ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार जळगाव शहरातील तळेले कॉलनीतील दत्त मंदीराजवळ उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मनिषा चंद्रशेखर पाटील (वय-४२) रा. दत्त मंदीरजवळ, तळेले कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या कारच्या बोनटजवळ त्यांनी पर्स ठेवलेली होती. पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ४ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल ठेवलेला होता. अज्ञात चोरट्याने कारच्या बोनटवरून दागिने व रोकड ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मनिषा पाटील यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी २९ जानेवारी रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर या घटनेचा पुढील करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #chori #jalgaon #shanipeth police Crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif