पाचोरा टेनिस बॉल प्रमिमर लीग स्पर्धेत पाचोरा वॉरीअर विजयी तर श्रीनिवासन हाॅस्पिटल संघ ठरला उपविजेत

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा टेनिस बॉल प्रमिअर लीग सीजन ५ छत्रपती गृप आयोजित चार दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना २९ जानेवारी रोजी खेळण्यात आला. पाचोरा वॉरिअर व श्रीनिवास हॉस्पिटल, पाचोरा यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पाचोरा वॉरिअरने बाजी मारल्याने हा संघ ३१ हजार रुपये रोख व शिल्ड घेऊन विजेता ठरला असून श्रीनिवास हाॅस्पिटल या उपविजेता ठरलेल्या संघाला २१ हजार रुपये रोख व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

विजेता व उपविजेता संघाला आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, माजी नगरसेवक भुषण वाघ, श्रीनिवास हाॅस्पिटलचे संचालक डॉ. नरेश गवांदे, डॉ. आलम शेख, सुनील सावंत, मोहीत राजपूत, गौरव चौधरी, चेतन पाटील, सुशांत जाधव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पंच म्हणून रोहित राठोड व दिपक राठोड यांनी काम पाहिले.
पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या चार दिवसीय टेनिस बॉल सामन्यात पाचोरा वॉरिअर, श्रीनिवास हॉस्पिटल, ए. पी. स्पोर्ट्स, पाचोरा स्पोर्ट्स, दिलीप वाघ (इलेव्हन), सुमित आबा लकी (इलेव्हन), एन. के. पारोचे या संघांनी सहभाग घेतला.

सामन्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून किरण ब्राम्हणे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मयुर पारोचे, बेस्ट प्लेअर्स तन्मय शिंदे, सामनावीर मयूर पारोचे यांनी मान पटकावला. ही स्पर्धा यशस्वीतेरित्या पार पाडण्यासाठी आकाश पाटील, मयूर पारोचे, आबा पाटील, समाधान देडे, आकाश नावरकर, अमोल पाटील, दिलीप पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.