विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा लांबला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्रि येथील बंजारा समाजाच्या कुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड हे जाणार असल्याने त्यांचे विमान टेक ऑफ करतानाच तांत्रिक बिघाड झाला. या विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संजय राठोड हे मुंबई विमानतळावर प्रतीक्षा करत आहेत.

या महाकुंभाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरु रामदेव बाबा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.आज या महाकुंभाचा समारोप होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने महाकुंभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राठोड शासकीय विमानातून जळगावच्या दिशेने रवाना होणार होते. परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सध्या सर्व जण मुंबई विमानतळावर विमान दुरुस्त होण्याची प्रतीक्षा करत आहेत. जळगावातील कार्यक्रम महत्त्वाचा आहे. मुंबई ते जळगाव हे अंतर फार असल्यामुळे ते रस्ते मार्गाने गेले तरी कार्यक्रमाला पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.