बैलाने शिंग मारल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील जुनोनी येथील एका साठ वर्षे वृद्ध व्यक्तीला बैलाने शिंग मारून जखमी केल्याची घटना घडली असून यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आले आहे.

नामदेव जयसिंग राठोड वलसाड राहणार जुनोनी असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांना बैलाने शिंग मारल्याने त्यांना उपचारासाठी त्यांचा भाऊ पतंगी राठोड येणे ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून अमृत घोषित केले. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.