शिवाजीनगर येथून 23 वर्षीय तरुण बेपत्ता

0

जळगाव ;– शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या 23 वर्षे तरुण आजी आजारी असल्याचे सांगून घरातून निघून गेल्याचा प्रकार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की खाजगी नोकरी करणारा हरीश संतोष चव्हाण वय 23 हा शिवाजीनगर परिसरातील धनाजी काळे नगर येथे वास्तव्याला असून २ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता त्याचे मालक योगेश हरी पाटील यांना माझी आजारी आजी असून मी तिला पाहण्यासाठी घरी जाऊन येतो असे सांगितले मात्र त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याची आई पुष्पा संतोष चव्हाण यांनी खबर दिल्यावर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद 4 रोजी दुपारी करण्यात आली आहे. तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रतिभा पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.