विजेचा धक्का लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

0

जळगाव ;– धरणगाव तालुक्यातील दोनगाव खुर्द येथे विजेचा धक्का लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १० फेब्रुवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद ककरण्यात आली आहे.

विजया राहुल पाटील (वय २४, रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती गावात पती, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होती. विजया पाटील यांचे पती राहुल हे सेंट्रिंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नळाचे पाणी आले होते.

त्यावेळेला पाण्याची मोटार लावण्यासाठी गेलेली विवाहिता विजया पाटील यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी सदर विवाहितेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.