ब्रेकिंग :Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेशात भाजपने सत्ता राखली ; काँग्रेसला अवघ्या ६६ जागा

0

भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळाली असून भाजपने एकूण २३० जागनपैकी १६२ जागांवर विजय मिळविला असून काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच इतर २ उमेदवार निवडून आले आहेत.

अमित शाह यांची अचूक रणनीती, त्याला मिळालेला प्रतिसाद, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं मिळालेलं मार्गदर्शन, संघटनेचं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे निवडणुकीला वेग आला.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या कामाची आम्ही मध्य प्रदेशमध्ये योग्यरीत्या अंमलबजावणी केली. तसेच मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मीपासून लाडली बेहना अशा योजना आणल्या. त्यामुळे गरिबांसाठी, भाचे-भाच्यांसाठी काम झालं. या कामानेही जनतेची मनं जिंकली. तसेच मध्य प्रदेश एक कुटुंब बनला. अशी प्रतिक्रिया शिवराज सिंह चौहान (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश) यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.