परप्रांतीय पदव्युत्तर वैद्यकीयशास्त्राच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवाजीनगर परिसरात पदव्युत्तर वैद्यकीयशास्त्राची विद्यार्थिनी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. परप्रांतातील असल्याने नातेवाईक असल्याचा गैरफायदा घेत एका रिक्षाचालकाने या विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवत, हा व्यक्ती गेल्या ६ महिन्यांपासून त्या तरुणीचा पाठलाग करत होता. मात्र, आता डोक्याच्या वर पाणी गेल्याने शहर पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार देत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परप्रांतीय महिला डॉक्टरला एकटी पाहून गेल्या काही महिन्यापासून रईस जफर खान (वय २९, रा. शिवाजीनगर) हा रिक्षाचालक पाळत ठेवून होता.

सलग तरुणीचा पाठलाग करणे, तिला त्रास देणे, तिच्याशी जवळीक साधून फोटो काढणे, हा सर्व प्रकार सुरु असतांना देखील त्या तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण रिक्षा चालकाची हिम्मत वाढत गेल्याने, शेवटी त्या तरुणीने तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिल्यावर रईस नावाच्या (रा.शिवाजीनगर) रिक्षाचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वर्णनावरुन रईस नावाच्या भामट्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. पुढील तपास महिला पोलिस अश्विनी इंगळे या करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.