लोकशाही न्यूज नेटवर्क
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या मिशन शाळेच्या प्रवेशद्वारावरील एका हॉटेलला मध्यरात्री भीषण आग आलगल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलमधील साहित्य जाळून खाक झाल्याने हॉटेल चालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
नंदुबार शहरातील नेहमी गजबज असलेल्या सिंधी कॉलनी परिसरातील हॉटेलला आग लागली होती. रात्रीच्या सुमारास सर्व काम आटोपून हॉटेल बंद करून घरी गेले होते. मध्य मध्यरात्रीच्या सुमार हॉटेलला अचानक आग लागली. या लागलेल्या भीषण आगीत हॉटेलमधील ५ ते ६ फ्रिज, खाण्याचे साहित्य, टेबल खुर्च्या, यांच्यासह स्वयंपाक तयार करण्याचे भांडी आदी साहित्य आगीत जळून खाक झाल्याचे दिसून आले.
आगीचे कारण अस्पष्ट
हॉटेल मालक यांच्या म्हणण्यानुसार आगीत हॉटेलमधील मालासह चार ते पाच लक्ष रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र सदरची आग ही कशामुळे लागली, हे अद्यापही निष्पन्न झाले नसून या सर्व घटनेच्या तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरू केला आहे.