लोकशाही न्यूज नेटवर्क
माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई मीनल गावसकर यांचे मुंबईत आज निधन झाले. गावसकर यांच्या आईची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली होती. मीनल गावसकर यांनी वयाच्या ९५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, गावसकर यांच्या आईचे वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे निधन झाले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सुनील गावसकर हे समालोचन करत होते. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने सामना जिंकला होता. त्यांना आईच्या निधनाची वार्ता सकाळी मिळाली होती. त्यानंतरही त्यांनी समालोचन सुरु ठेवत आपले कर्तव्य बजावले.