“माझा नवरा नामर्द आहे” म्हणत विवाहितेची पोलिसात तक्रार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बांदामध्ये एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. तेथे एका नवविवाहित वधूने तिच्या पतीविरोधात तक्रार करत त्याच्यावर गंभीर आरोप लावले. “माझा नवरा नामर्द आहे”. त्याचा हा आजार लपवून माझं लग्न लावून देण्यात आलं. एवढंच नव्हे तर, सासरचे लोकही हुंड्यासाठी माझा छळ करतात”. असा आरोपही तिने लावला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केली असता, पोलिसांची यात एंट्री झाली. त्यांनी चार डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्विशियनचे पॅनेल नेमून त्यांच्याद्वारे वैद्यकीय तपासणी करून घेतली.

सहा महिन्यांपूर्वीच झाला विवाह

तिंदवारी येथील एका ३१ वर्षीय तरुणीने सहा महिन्यांपूर्वी हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात लग्न झाले होते. पण गेल्या तीन महिन्यांपासून ती नवविवाहित महिला तिच्या माहेरीच राहत होती. पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार तिने तिंदवारीपोलीस ठाण्यात दिली होती. आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही, तेव्हा त्यांनी मला बेदम मारहाण केली. तसेच माझा नवरा नामर्द आहे, हे सत्यही लग्नाच्या वेळी माझ्यापासून लपवून ठेवण्यात आले, असे त्या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पीडितेच्या पती आणि तिच्या सासरच्या इतर लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. शनिवारी पोलिसांनी आरोपी पतीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. येथे पाच सदस्यांच्या पॅनेलमध्ये डॉ. विनीत सचान, डॉ. हदेश पटेल, डॉ. हरदयाल, डॉ. अंकित आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ रामलखन चौरसिया यांनी पतीचे वीर्य आणि मानसिक स्थिती तपासली. या प्रकारचा अधिक तपास सुरु आहे. या अंतर्गत पतीची तपासणी करण्यात आली आहे. तपासाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाईल, असे तिंदवारी पोलीस ठाण्याचे प्रभारी कौशल सिंह यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.