जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे घरातून अपहरण केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहितीनुसार, शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले कुटुंबीय वास्तव्यास असून, त्यांच्या १४ वर्षीय मुलाला घरी असतांना त्याचे कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे उघडकीस आले. त्यांनी मुलाला संपूर्ण परिसरात शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा खाल करण्यात आला आहे. पुढील तपस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहे.