जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
लग्नसराईचा हंगामात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ९५० रुपयांची वाढ दिसून आली आहे. तरीदेखील सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल दिसून येते आहे.
सोन्याच्या दराने जळगावच्या सुवर्णबाजारात प्रतितोळा ६३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नोव्हेंबर महिन्यात सोने दर प्रतितोळा ६२ हजार रुपये असे सरासरी होते. सोन्याचे दर या महिन्यात सतत वाढले आहेत. १ डिसेंबर रोजी सोने दरात मोठी तेजी आली होती. दर एक तोळ्यामागे ९०० रुपयांनी वाढले व दर ६५ हजार ९६ रुपये प्रति तोळा असे झाले होते. ४ डिसेंबर रोजी सोन्याचा दर ६६ हजार २२९ रुपयांवर स्थिर होता.
जळगावातील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर ६३, १९० रुपये आहे. तर चांदीचा दर ७५,४३० रुपये आहे.