Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»राज्यकारभार नीट केला नाही तर पायउतार व्हावे लागते !
    महाराष्ट्र

    राज्यकारभार नीट केला नाही तर पायउतार व्हावे लागते !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 30, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    देशभक्त नागरिक आणि समाज असेल, तर तो देश मोठा होतो, असे प्रतिपादन करत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजा आणि राज्यकारभार कसा असावा? याबाबत महत्त्वाचे भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राज्यकारभार करणाऱ्या राजाचे वर्तन कसे असावे, यावर महत्त्वाचे विधान केले आहे. मुंबईच्या विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या 101 व्या वर्धापनदिनानिमित्ताने केले. ‘सामाजिक परिवर्तन  संस्थांची भूमिका’ या विषयावर सरसंघचालक भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य करताना नागरिकांनी आणि राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांनी कोणती मूल्य जपली पाहीजेत, यावर विवेचन केले.

    “पैशांची उधळपट्टी न करता समाजात साधेपणाने आणि काटकसरीने रहावे, स्वदेशीची कास धरुन गरजूंना आर्थिक मदत करावी. घरात दोन मोटारगाड्या, महागडा स्मार्ट रंगीत दूरचित्रवाणी संच आदी चैनीच्या वस्तूंची खरोखर गरज आहे का? याचाही प्रत्येक सुजाण नागरिकाने विचार करावा. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पर्यावरणाचे रक्षण करावे. सुजाण, शिस्तप्रिय व देशभक्त नागरिक आणि समाज असेल, तर तो देश मोठा होतो. यादृष्टीने सामाजिक संस्थांनी नागरिकांमध्ये ही जाणीव व प्रेरणा निर्माण करण्यासाठी मनपरिवर्तनाची जबाबदारी पार पाडावी”, असे आवाहन मोहन भागतव यांनी व्याख्यानादरम्यान बोलताना केले.

    .. तर राजालाही पायउतार व्हावे लागते

    “राजा हा समाजामुळे असतो आणि नीट राज्यकारभार केला नाही, तर त्याला पायउतारही व्हावे लागते”, अशी अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाच्या उत्थान व पतनावर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचीच जबाबदारी महत्त्वाची असते”, असे सांगून भागवत यांनी प्रगत देशांमधील नागरिकांचे वर्तन, विचार आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील काही घटनांचा उल्लेख केला.

    Mohan Bhagwat RSS
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif