लोकसभा अध्यक्षांची मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यास मंजुरी

0

नवी दिल्ली ;- मणिपूर येथे झालेल्या महिलांच्या अत्याचार आणि त्यावरून झालेल्या हिंसाचारावरून देशभरात संतापाची लाट असल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने आज लोकसभा अध्यक्षांनी मोदी सरकार विरुद्धचा ठराव आणण्यात मंजुरी दिली
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूर केली आहे. त्यानुसार आता सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव विरोधक सभागृहात मांडणार आहेत.अविश्वास ठरवाच्या निमित्ताने तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर निवदेन देतील, अशी आशा विरोधकांना आहे. काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आले होते.कोणताही सदस्य अविश्वास ठराव आणू शकतो. मात्र ५० खासदारांच्या सह्याचे अनुमोदन त्यासाठी आवश्यक असते. त्यानुसार काँग्रेसने याची तयारी केली. २०१४ पासून हा दुसरा अविश्वास ठरवा आहे. अध्यक्ष परवानगी देणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र त्याला परवानगी मिळाली आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अविश्वास प्रस्तावासाठी तारिख आणि वेळ ठरवतील. त्यानुसार अविश्वास ठराव मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी सरकारविरोधात मणिपूर घटनेवरून अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी ही बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अविश्वास ठरावाची नोटीस दिली. यानंतर अध्यक्षांनी विरोधकांना अविश्वास ठराव मांडण्याची परवानगी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.