मेहरूण परिसरातून दुचाकी चोरट्याला अटक ; तीन दुचाकी हस्तगत

0

जळगाव;- शहरातील मेहरून परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील एका आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या असून त्याच्याकडून तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मेहरून भागात असणाऱ्या विठ्ठल मंदिराजवळ 20 जुलै रोजी कल्पेश लहू कोल्हे यांची दुचाकी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता .याप्रकरणी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाल्यानुसार संशयित संतोष शांताराम सपकाळे राहणार जोशी वाडा मेहरून हा चोरीच्या गुन्ह्यातील मोटर सायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले असता त्याने तीन दुचाकी चोरल्याची माहिती दिली .यात कल्पेश कोल्हे यांची दुचाकी क्रमांक एम एच 15 डीजी 61 56, एक्स स्प्लेंडर प्लस आणि डीलक्स कंपनीची अशा 45 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद सिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण ,रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील योगेश बारी आदींच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.