जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथून एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याचा प्रकार 24 जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे करीत आहे

