ठाकरेंना मोठा धक्का.. आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आणखी आमदार शिवसेनेला सोडून गेला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी येथील आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

आमदार संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांचे मोठे खंदे समर्थक समजले जायचे. कालपर्यंत त्यांच्या सोशल मीडियावर शिवसेनेला समर्थन दर्शवणाऱ्या पोस्ट होत्या. दरम्यान आज ते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या  गटाच्या आमदारांची संख्या ४० झाली तर उद्धव ठाकरे समर्थक आमदारांची संख्या १५ इतकीच राहिली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.