एमआयडीसी परिसरातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

0

जळगाव ;- शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका कॉलनीमधून १८ वर्षीय तरुणी कुणालाही न सांगता निघून गेल्याचा प्रकार ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका कॉलनीत खाजगी नोकरी करणारे व्यक्तीची १८ वर्षाची मुलगी 9 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते सकाळी १० रोजी ७ वाजे दरम्यान घरातील सर्व कुटुंब झोपलेले असताना ती कुणासही काही एक न सांगता निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला असता मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.