ओझर येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

0

पाचोरा;- तालुक्यातील ओझर येथे एका 27 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ओझर येथे प्रवीण चुडामन पाटील वय २७ याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला होता. त्याला भाऊ ज्ञानेश्वर पाटील यांनी मृता अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.