बाल्कनीमधून खाली पडल्याने 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

0

मुक्ताईनगर ;- शहरात राहणाऱ्या एका 75 वर्षे वृद्ध व्यक्तीचा घराच्या दुमजलीच्या इमारतीच्या बालकनी मधून तोल जाऊन खालच्या मजल्यावर ओट्यावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की शहरातील शनी मंदिर जवळ, साई गजानन कॉलनी ,जुना मुक्ताई रोड येथे राहणारे ब्रिजलाल सोनू इंगळे वय 75 यांचे दोन मजली घर असून घरात असलेल्या बालकनी मधून ते तोल जाऊन खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामं रुग्णालय मुक्ताईनगर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर भोई करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.