पाळधी ता. धरणगाव ;- येथील साठघर मोहल्ल्यात दोन जणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने त्यामध्ये दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील साठघर मोहल्ल्यात दोघांमध्ये बाचाबाची सुरू होती. या वेळी एकाने रमजान महीना सुरू आहे भांडण करू नका असे सांगितले त्याच्या राग आल्याने तेथे गर्दी जमून लाठ्या, काठ्या, सळई व दगडांचा मारा करण्यात आला. यामध्ये एकाच्या कपाळावर लोखंडी सळई मारून जखमी केले. तर चुलत भाऊ यास लाठ्या काठ्याने मारून जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या घटनेत जावेद खान हमीद खान, शोएब खान हमीद खान हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी जावेद खान हमीद खान यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अहमद शेख निसार, अन्वर शेख सत्तार, जावेद शेख अजीज, नुर शेख गफ्फार, मुस्ताक शेख अ.रहीम, रफीक शेख अ. रहीम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
=============================
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post