सराफ व्यावसायिकांचे हवाल्याचे ७ कोटी रुपये रस्त्यातच लुटले

0

१२ दरोडेखोरांना अटक ; पोलीस असून तपासणीचा बहाणा करुन लुटली रोकड

जळगाव : शहरातील काही बड्या उद्योजकांसह सराफ व्यावसायीकांचे कोट्यावधी रुपये हवाल्यामार्फत मुंबई येथे घेऊन जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यातच शहापूर परिसरात एक वाहनातून सात ते आठ जण येवून त्यांनी ही रोकड लुटल्याची घटना गेल्या आवठड्यात घडली होती. या घटनेमुळे व्यावसायीकांमध्ये मोठी खळबळ माजून गेली आहे. याप्रकरणी काही दिवसांपुर्वी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी बारा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

जिल्ह्यातील धरणगाव-मुसळी फाट्याजवळ गेल्या महिन्यात कापूस व्यापाऱ्याचे दीड कोटी रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली होती. यापुर्वी देखील काही वर्षांपुर्वी रोकड घेऊन जाणाऱ्या कापूस व्यापाऱ्याला लुटणाऱ्यांनी त्याचा निघृण खून केला होता. मात्र व्यापाऱ्याने त्याच्याजवळील पैशांची बॅग न सोडल्यामुळे हल्लेखोरांचा प्रयत्न फसला होता

मुंबई येथे कमी किंमतीत सोने मिळत असल्याने ते घेण्यासाठी शहरातील पाच ते सहा सराफ व्यावसायीक व उद्योजकांकडील ७ कोटी हवाल्याची रोकड घेवून तो उच्चभ्रू व्यावसायीक दि.१५ रोजी एका बोलेरो वाहनात कुरिअरचे १२ पार्सल घेवून ते मुंबईला जाण्यासाठी निघाले.

रोकड लुटल्यानंतर काढला पळ शहापूर खर्डी गावालगत गोपाळकृष्णढाब्याच्या पुढे इनोव्हा वाहनात आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी त्यांच्या वाहनाला अडविले. आपण पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांना काही अंतरावर असलेल्या एका बंद कंपनीच्या मागे दोघांना घेऊन जात वाहनातील गोण्यांमध्ये असलेली रक्कम काढून घेत रिकामे बॉक्स पुन्हा परत वाहनात ठेवून त्यांनी पळ काढला होता.

१२ दरोडेखोरांना अटक
शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करीत लुटल्यामुळे सराफ व्यावसायीकांमध्ये खळबळ माजून गेली होती. काही दिवसांनंतर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित आठ दिवसात बारा दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून काही रोकड हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.