क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
IPL 2024 ला शानदार सुरुवात झाली आहे. आज सायंकाळच्या सत्रातील दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डन्सवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आले. मात्र त्यांची हैद्राबादच्या गोलंदाजी पुढे सपशेल नांग्या टाकल्या होत्या. अवघ्या ५१ धावांवर कोलकाताच्या ४ विकेट तंबूत परतल्या. मात्र रसल च्या शानदार खेळीमुळे 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावांचा डोंगर त्यांनी उभा करत सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य दिले.
कोलकाताकडून आंद्रे रसेलने शानदार खेळी केली. आंद्रे रसेलने 25 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्याशिवाय फिलिप सॉल्टने 54 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकात्याची सुरुवात खराब झाली आणि टी नटराजनने एकाच षटकात कोलकाताला दोन धक्के दिले. कोलकाताने 51 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. पण रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांच्या भागीदारीने कोलकात्याचा संपूर्ण सामना फिरवला.