जुन्या भांडणातून विवाहितेसह इतरांना मारहाण ; ९ जणांविरुद्ध गुन्हा

0

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील भांडणाच्या कारणावरून विवाहितेसह तिच्या नातेवाईकांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जामनेर शहरातील माळी गल्ली परिसरात घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माया राहुल माळी (वय-२३) रा. माळी गल्लीजामनेर या महिला बुधवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता मागील भांडणाच्या कारणावरून तुषार शिवाजी झाल्टे, अश्विनी शिवाजी झाल्टे, रेखाबाई शिवाजी झाल्टे, आशाबाई ईश्वर रोकडे, राजनंदिनी गणेश झाल्टे, गणेश राजाराम झाल्टे, सचिन राजाराम झाल्टे, नितीन राजाराम माळी आणि अक्षय रामदास माळी सर्व रा. धनपुष्प कॉलनी, जामनेर यांनी लाथाकाठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच माया राहुल माळी यांचे पती राहुल माळी यांना देखील पाठीवर व उजव्या हातावर बेदम मारहाण करून जंभीर गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जयेंद्र पगारे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.