धरणगावातून व्यापाऱ्याची पावणे सात लाखाची रोकड लंपास

0

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात अनिल कुमार अँड हेमराज कंपनी नावाने किराणा दुकानासह होलसेलचे व्यापारी गौरव डेडीया यांचे दुकान आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुंजन डेडिया हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले होते.

गुंजन डीडिया यांनी दुकानाचे बाजूचे शटर उघडून पैशांची पिशवी दुकानात ठेवले आणि समोरील शटर उघडण्यासाठी गेले . याच वेळेत दोन अज्ञात भामट्यांनी दुकानात घुसून रोकड असलेली पिशवी घेऊन दुचाकीवर पळ काढला. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक चोरट्यांच्या तपासात वेगवेगळ्या भागात गेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.