माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीविषयी मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते.

मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाईल.

गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.