कौमार्य; कुप्रथेला बळी पडल्या दोन सख्ख्या बहिणी…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

लग्न म्हटलं कि दोन जीवांच्या मिलनासह दोन कुटुंबाचे एक होण असत. त्यांच्यातील जवळीकता आणि एकोपा वाढू लागतो. आणि मुलगा व मुलगी लग्नानंतर आनंदी जीवनाचे स्वप्न सजवतात. आपल्या भाविश्यासाठीचे. मात्र असे असूनही एका कुप्रथेला बळी पडून महाराष्ट्रात दोन बहिणींना लग्नाच्या चार दिवसानंतरच सासरच्यांनी छळ सहन करावा लागल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. त्याच्या सासरच्यांनी दोन्ही बहिणींची कौमार्य चाचणी केली. (“कौमार्य चाचणी” म्हणजे एखाद्या स्त्रीने लग्नापूर्वी कोणाशी शारीरिक संबंध ठेवले होते की नाही.)

या चाचणीत जेव्हा दोन बहिणींपैकी एक अपयशी ठरली तेव्हा तिच्या नवऱ्याने घटस्फोट घेतला. या घटस्फोटासाठी दोन्ही बहिणींच्या पतींना सामुदायिक पंचायतीकडून परवानगी मिळाली. आता नाखूष बहिणीने पोलिसांना पत्र लिहून आपल्या वेदना सांगितल्या. तिचे लग्न कर्नाटकातील बेळगाव येथे झाल्याचे बहिणीने आपल्या पत्रात पोलिसांना सांगितले. लग्नाच्या फक्त चार दिवसानंतर सासरच्यांनी तिला त्रास देणे सुरू केले. त्यांनी दोन्ही बहिणींची कौमार्य चाचणी केली. त्यानंतर पाचव्या दिवशी कर्नाटकातून कोल्हापूरला त्याच्या घरी पाठविण्यात आले. दोन्ही बहिणी कोल्हापूरच्या कंजरभाट समाजातील आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याचे समाजातील मुलांशी लग्न झाले.

पीडितेचे म्हणणे आहे की माझ्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या सासऱ्यांना बरेच समजावले,परंतु ते काहीही ऐकण्यास तयार नव्हते. मग फेब्रुवारी महिन्यात त्यांनी सामुदायिक पंचायतीने घटस्फोट जाहीर केला. त्यानंतर बहिणींनी मदतीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे संपर्क साधला. तसेच पोलिसांना त्यांच्या पतींवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

पोलिसांनीही या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत दोन बहिणींच्या पती आणि सासरच्या लोकांसह 8 जणांवर गुन्हा दाखल केला. दोन्ही बहिणी आपल्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा मागणी करीत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोन तरुणांना लग्नापूर्वी मुली आवडत नव्हत्या. त्यांनी फक्त दोन्ही महिलांचे शारीरिक शोषण केले. यामुळे त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा. समितीच्या सदस्यांनी या कौमार्य चाचणीला घृणास्पद कृत्य म्हटले आहे. ते सरकारला आवाहन करतात की सामुदायिक पंचायत रद्द कराव्यात. हे खूप वाईट आहे की आजही लोक आपल्या सुनेची कौमार्य चाचणी करतात. हे त्याच्या मागासलेली मानसिकता प्रतिबिंबित करते.

 

चाचण्या करूनही दोन्ही मुलांनी मुलींवर शारीरिक अत्याचार केले. नंतर घटस्फोट देऊन त्यांना सोडून पण दिले. अर्थात अशा दोषी पतींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी अ.नि.स तर्फे करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.